अंकः किर्लोस्कर, ऑगस्ट १९७०
लेखाबद्दल थोडेसे : एखाद्या उद्योगसमुहाचे स्वतःचे मासिक असावे ही संकल्पना विदेशात रूजलेली होती. ती मराठीत किर्लोस्करने सुरु केली आणि पुढे तिचा विस्तार होत गेला. किर्लोस्कर मासिकाने केवळ त्यांच्या उद्योगसमुहाचेच नव्हे तर तमाम सुशिक्षित, सुसंस्कृत मराठी समाजाचे प्रतिनिधित्व केले. मासिकाचा विस्तार करीत स्त्री, मनोहर ही अन्य नियतकालिकेही सुरु केली. ऐतिहासिक कामगिरीनंतर काळाच्या एका टप्प्यावर मासिकांचे अवतारकार्य संपून किस्त्रीम हा एकत्रित दिवाळी अंक उरला. आता त्याचेही अस्तित्व दिसत नाही. या सगळ्याची सुरुवात कशी झाली त्याची रंजक हकीकत या संपादकीय लेखात वाचायला मिळते.
********
मासिकाच्या संपादनाची खुबी थोडक्यात सांगायची तर ते काम व भोजन वाढणाऱ्या गृहिणीचे काम यात विशेष अंतर नाही. एक कागदाचे पान तर एक केळीचे. दोन्हींवर निरनिराल्या रुचींचे व रसाचे साहित्य व चटण्या-कोशिंबिरी वाढायच्या असतात, पण त्याची जागा व प्रमाण ठराविक पाहिजे. रोजच्या भात-भाजीच्या जोडीला एक खास पक्वान्न हवे. आणि हे सर्व पदार्थ अगदी ताजेतवाने, गरमागरम पाहिजेत. या भोजनाने पोट व मन तर भरलेच पाहिजे, पण ते आरोग्याला पौष्टिकही ठरले पाहिजे. आणि या पानाभोवती सुंदर रांगोळी असली आणि हवेत उदबत्तीचा घमघमाटही सुटला असला तर कोणीही भोजनभाऊ मिटक्या मारीतच त्यावर हात मारणार.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Sandhya Limaye
4 वर्षांपूर्वीअप्रतिम माहिती