पुण्याखेरीज व वेगवेगळ्या स्थळी, भिन्न काळी केलेल्या चाचणी पाहाणीत दिल्लीखेरीज झालेल्या विवाहांचे वेळी ज्योतिषपद्धतीचा शे. ८० टक्क्यांचेवर उपयोग केला जातो हे सिद्ध झाले आहे. या सर्व गोष्टींमागे खरोखरच अंधश्रद्धा आहे, की शास्त्र प्रचीती आहे, की एक वेडगळ कल्पना आहे या गोष्टींची छाननी करणे आवश्यक आहे! परंतु यासंबंधी कोणी चाचणी पाहाणी केलेली आढळत नाही! खरोखरीच तशी पाहाणी करणे अवघड आहे. कारण या ठिकाणी वैयक्तिक मताचा प्रश्न निर्माण होतो. सुखी वैवाहिक जीवन घालवलेली मंडळी स्वतःच्या कर्तृत्वाकडे बोट दाखविणार, तर विवाह होऊन कौटुंबिक जीवन भकास व निष्फळ झालेली मंडली दैवाला दोष देणार! किंवा वडीलधाऱ्या मंडळींना जबाबदार ठरविणार! कारण लग्नाचे वेळी बधूवरांची वये गद्धेपंचविशीत असल्यामुळे इतर सांसारिक जबाबदारीचा विचार करण्याइतकी मने प्रगल्भित झालेली नसतात! निव्वळ ती बाहुली असतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Kiran Joshi
3 वर्षांपूर्वी१९६५ सालचा हा लेख आहे आणि तरीही लेखकाने पत्रिका पाहून लग्न केलेल्यांच्या आयुष्यांचा शास्त्रीय पद्धतीने धांडोळा घेतला जात नाही म्हणून खंत व्यक्त केली आहे. या लेखकाचे वैयक्तिक मत , आलेल्या अनुभवावरून ही बदलू नये...याचे आश्चर्य वाटते...आपण आलेल्या अनुभवावरून देखील शहाणपण शिकत नसल्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण विलक्षण वाढले आहे....