आपल्याकडे अद्यापीही एखादा मनुष्य एकाच प्रकारचे दुकान काढीत असतो. म्हणजे वाणजिनसाचे किंवा कापडाचे किंवा स्टेशनरी. संसारांत लागणाऱ्या सर्व वस्तूंचा संग्रह एके ठिकाणी करून Stores काढण्याची कल्पना आमच्या इकडे अजून बाल्यावस्थेंत आहे. पुण्यामुंबईस कांही दुकाने (Stores) या नावाने मोडतात; पण पाश्चिमात्य स्टोअर्स प्रमाणे त्यांचेमध्ये सर्व जिनसा मिळत नाहीत. आमच्या या स्टोअर्सचा मुख्य भर कापड/कपडे यावर आहे.
युरोपीय स्टोअर्सची कल्पना फारच व्यापक व सर्व संग्राहक आहे. लंडन येथील प्रख्यात हॅरॉड स्टोअर्स घ्या. या दुकानात मिळत नाही असा एकही जिन्नस नाही. भाजी, धान्य, खेळणी, कापड, बूट जोडे, चैनीच्या वस्तू, स्टेशनरी, काय वाटेल ते मागा ते हॅरॉड स्टोअर्समध्ये मिळते. आमच्याकडे हिंदूच्या मालकीचा, हिंदू दृष्टीनं काढलेला असा एकही स्टोअर नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .