मराठींत नांव घेण्याजोगे पहिले आत्मचरित्र म्हणजे प्रो. अण्णासाहेब कर्वे यांचे आत्मवृत्त होय. प्रो. कर्वे यांची कार्यैकनिष्ठा प्रसिद्धच आहे. आयुष्याची सुमारे चाळीस वर्षे त्यांनी स्त्रीशिक्षणाच्या कार्याला वाहून घेतले आहे. आणि महिला विश्र्वविद्यालय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे. त्यांनी केलेले कार्य महनीय आहे, तसेच स्त्रीशिक्षणाच्या बाबतींत महाराष्ट्रांत घडवून आणलेली क्रांतीही स्पृहणीय आहे. कित्येक आपल्या हयातींत बुद्धिमत्ता किंवा सततोद्योग या गुणामुळे थोर कार्य करतात; परंतु त्यांच्या जीवना वृत्तांतांत उदात्तता असतेच असे नाही. आणि अशी उदात्तता नसली म्हणजे आत्मचरित्र हा एक इतिहास बनतो. फरक एवढाच की जो इतिहास दुसऱ्या कोणीही लिहिला असता तो ती व्यक्ती स्वतः लिहिते. प्रो. कर्वे यांच्यामध्ये अनुकरणीय चारित्र्य आणि महनीय कार्य यांचा सुंदर मिलाफ झालेला आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
3 वर्षांपूर्वीचांगला आहे लेख .