अमेरिकेतील तेलाचे राजे ज़ॉन. डी. रॉकफेलर यांनी यावेळेपर्यंत करोडो रुपये या धंद्यावर मिळविले होते. यांचा धंद्यांचा पसारा बऱ्याचशा प्रमाणांत उत्तर-अमेरिकेतच पसरलेला होता. युद्धाच्या काळांत व त्या पाठोपाठ ब्रिटिश-अंकित कांही तेलकंपन्यांनी आपले पाय खुद्द उत्तर अमेरिकेत तर रोवलेच होते; पण त्यांनी दक्षिण- अमेरिकेतील कांही देशांतून नवीन तेलाच्या खाणी शोधून काढल्या होत्या. अमेरिकेतील तेलाच्या राज्यास बाल्कन प्रांत, रशिया, ईस्ट इंडिज, बर्मा या भागांवर प्रभुत्व मिळविता आले नाही. त्यामुळे जॉन डी. रॉकफेलर व युरोपांतील तेलाचे नोपेलियन या नांवाने संबोधले जाणारे सर हेन्री डिटरडिंग यांचे दरम्यान कोणी तेलाच्या धंद्यांची सत्ता काबीज करावयाची, याची शर्यत सुरू झाली व ही शर्यत म्हणजेच सन १९२० नंतरची पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धांतील तेलाची वाढ, शर्यत ही होय.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .