सन १९१० मध्ये सर रतन टाटा यांनी डॉ. भिसे यांच्याबरोबर भागीदार होण्याचे कबूल केल्यानंतर पुढील उद्योगासाठी सहकुटुंब विलायतेस राहाण्याचे त्यांनी मुक्रर फेले. हिंदुस्थानचा किनारा सोडून मार्सेलीसला येईपर्यंत डॉ. मिसे यांची प्रकृती चांगली होती. परंतू त्यानंतर त्यांना मलेरियानें पछाडले व विलायतेत आल्यानंतरही तापाचा जोर बराच होता. या आकस्मिक संकटामुळे आपल्या उद्योगाकडे लक्ष देण्यास त्यांना सवड मिळेना. तापाचे प्रमाण वाढतच चालले व विलायतेंतील मलेरियावरील अत्यंत आधुनिक औषधांनी सुद्धा त्यांना गुण पडेना. सर्व मंडळींनी व डॉक्टरांनी सुद्धा त्यांची आशा सोडली होती. त्यांच्या ह्या स्थितीची बातमी त्यांच्या एका बंगाली मित्राला कळली व त्याने आपल्या ब्रह्मदेशांतील व्यापारीमित्रांकडून हिंवतापावरील देशी औषध ताबडतोब पाठवून दिले. आपले सर्व उपाय हरले अशी डॉक्टरांची खात्री झाल्यानंतर त्यांनी रा. भिसे यांना तें औषध घेण्याची परवानगी दिली व आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच औषधाने त्यांना गुण पडू लागला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .