“वा, म्हणून काय झालं? सकाळची वेळ, अन् चहा घेतल्याशिवाय तुम्हांला जाऊं दिल्याबद्दल घरी आल्यावर मला काय म्हणतील?" असें म्हणून कमलाबाईंनी आपला चहा करण्याचा उद्योग चालूच ठेवला; व प्रभाकरपंतांनीही तिला विशेष हरकत घेतली नाही. इतक्यांत स्टोव्ह पेटून त्यावर चहाचे आधण ठेवून कमलाबाईंनी किटलींत चहाची पूड टाकली; व दोन कपबशा पुढे ओढून त्या म्हणाल्या,
“अन् प्रभाकरपंत, तेही खरंच आहे. इकडेही सरकारी नोकरी असायची म्हणून तर तुम्हांला आमच्याकडे येतां येतं. नाहीं तर मी चळवळीत पडल्यामुळे तुम्हांला आमच्या घरी यायची जरा अडचणच व्हायची नव्हे का?"
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .