एखादा मनुष्य मेला म्हणजे त्याच्या अगदी जवळच्या नातलगास भेटण्याकरितां त्याच्या घरी जाण्याची पद्धत आहे. अशावेळी आपणालाही फार दुःख झाले आहे असे दाखविण्याकरितां त्याच्याकडे जातांना आपला चेहरा शक्य तितका सुतकी करून आपण जात असतो! परंतु तेथे गेल्यावर तोच नातलग स्वतः हंसत खेळत असलेला दिसल्यावर आपल्या मुखावर हे लटके दुःख ठेवण्याची गरज भासत नाहीं. कमळाबाई एकाएकी नाहीशा झाल्यामुळे मन्याबापू फार काळजीत असतील इतकेच नव्हे, तर कदाचित् आपणास पाहिल्यावर त्याला रडे आवरेनासे होईल, अशी कांहींशी त्या दोघीजणींची कल्पना होती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .