“मन्यावापूची एकंदर बेफिकीर वृत्ति पाहिली म्हणा. कमळाबाईंसंबंधीं तो निर्धास्त असलेला दिसतो. शिवाय जें जें काय बोलतो तें कोणत्या अर्थानं असतं हेच कळत नाही. तो अद्याप गुप्त पोलिसांपैकींच एक आहे ही माझी शंका आतां जास्तच बळावली. मग तुम्ही काहीही म्हणा!"
“तो गुप्त पोलिस असो किंवा सुप्त पोलिस असो. महात्माजीचं राजकारण सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट व स्वच्छ आहे. त्यांत लपवाछपव कांही नाही. असा एकच काय पण सारं सी.आय.डी. खातं काँग्रेसमध्ये लोटल्यास, त्यांत आमचं नुकसान नाहीं. कर नाहीं त्याला डर कुणाची?" यमुनाबाई म्हणाल्या.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .