मन्याबापूच्या स्वरांतील छद्मीपणा कमलाबाईना चमत्कारिक वाटूं लागला. त्या आवेशाने म्हणाल्या, “कोणत्याही पवित्र व चांगल्या गोष्टीबद्दलही शंका घेणाऱ्या कावळ्यांच्या नजरेला व्रण तेवढेच दिसणार. देशसेविकांची माहिती तुझ्यापेक्षां मला अधिक आहे. आज प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक बाईनें देशहिताकडे लक्ष देऊन या वणव्यांत उडी घातली आहे." त्यांचा अगोदरच मोठा असलेला आवाज अधिकच चढूं लागला.
कमलाबाईंना अधिक चिडविण्यांत अर्थ नाहीं विचार करून मन्याबापू म्हणाला, "मी तुमचं म्हणणं सर्वस्वीं कबूल करतों, मामी. सरकारचं गुप्त पोलिसखातं सुटलं, पण तुमच्या काँग्रेसच्या गुप्त पोलिसखात्यांत अडकलो अन् त्यामुळे शंभर माणसांच्या डोळ्यांना जें दिसणार नाहीं तें दिसूं लागल्यामुळे त्याचं महत्त्व उगीचच मला अधिक वाटू लागलं. आम्हां गुप्तपोलीसांच्या डोळ्यांना उपजतच एक सूक्ष्मदर्शक यंत्र लागलेलं असतं त्यामुळे हें असं होतं. जित्याची खोड मेल्याशिवाय थोडीच जाणार?"
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .