कोर्टाला सुटी असल्यामुळे दादासाहेब जठार आज घरींच होते. त्यांचें चित्त फार अस्वस्थ झाले होतें. बाबूच्या चौलसमारंभासाठी आपली बहीण आपल्या घरी येते काय आणि परत मुंबईस स्वतःच्या बिऱ्हाडीं जातांना नाहीशी होते काय? तथापि ती अशी नाहींशी होण्यांत पोलिसांचे अंग असावे हा वर्तमानपत्री तर्क त्यांना खरा वाटला नाही. चौलविधि झाला त्या दिवशी संध्याकाळी कमळाबाई घरी जाण्यास निघाल्या. "मी तुला पोचवावयाला येतो," असे दादासाहेब म्हणाले; त्या म्हणाल्या, “तुला इतका त्रास कशाला? खारहून मुंबईला एकटी जायची भीति कसली? मी कालच काही कोकणांतून आलें नाहीं!” ‘‘हो तर! तुझ्यासारख्या देशसेविकेला सोबत हवी म्हटलं, हाच तुला अपमान वाटायचा! देशाला वाट दाखविण्यास तू निघालेली!" असा औपरोधिक विनोद करून तिला आपण एकटे जाऊ दिले याचा त्यांना खेद वाटत होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .