नवबौद्धांच्या राजवाड्यात एक मुलाखत

पुनश्च    संकलन    2018-02-03 06:00:47   

अंक-  मराठवाडा दिवाळी अंक १९६० महाराष्ट्रातील गावोगावच्या महार मंडळींनी बाया-पोरांसह पूर्वीचा हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांचे हे धर्मांतर योग्य की अयोग्य, हा प्रश्न आता धर्मांतर होऊन चुकल्याने अप्रस्तुत ठरतो. तथापि नवा धर्म स्वीकारल्यानंतर या नवबौद्ध म्हणजेच पूर्वास्पृश्य वर्गात खरोखरीच काही परिवर्तन घडून आले आहे काय? निदान परिवर्तनाची दिशा तरी उजळली आहे काय? नवे आचारधर्म अथवा नवे कर्मकांड निर्माण झाले आहे काय? त्यांच्या सवयी, पूर्वापार चालत आलेल्या त्यांच्यातील रूढी, त्यांचे राहणे, वागणे, आचारविचार यांत काही फरक झाला आहे काय? त्यांचे आर्थिक प्रश्न पूर्वीइतकेच बिकट आहेत, कमी झाले आहेत का वाढले आहेत? इत्यादी किती तरी प्रश्न या नवबौद्धांच्या संदर्भात आज सर्वांसमोरच उभे आहेत. अधूनमधून या अनुषंगाने विचारमंथनही होते. पण राजकारण सोडले तर बाकीच्या विविध क्षेत्रांत प्रत्यक्ष या महार मंडळींचे-नवबौद्धांचे- मत फारसे उमटून पडतच नाही. ते सदैव पार्श्वभूमीत राहते आणि आगंतुकाचा काथ्याकूटच अधिक असतो. परिस्थितीतील ही वास्तवता लक्षात घेऊन काही निवडक खेड्यांतील नवबौद्ध मंडळींशी अगदी अनौपचारिक आणि दिलखुलास बातचीत करावी या उद्देशाने आम्ही राजवाड्यांत (महारवाड्याला हल्ली राजवाडा या नावानेच संबोधले जाते.) प्रवेश केला.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , मराठवाडा , मुलाखत , अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    वेगळा विषय - वेगळी माहिती मिळाली .

  2. Balakrishna

      7 वर्षांपूर्वी

    जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

  3. Vitthal

      7 वर्षांपूर्वी

    आता परीस्थीती बदलत चाललीय.

  4. जयदीप गोखले

      7 वर्षांपूर्वी

    लेख उत्तम आहे. लेखकाचे नाव समजू शकेल का?

  5. Ani1985

      7 वर्षांपूर्वी

    खरच लेख खूप छान आहे हा लेख ज्याने कोणी लिहिला आहे त्याची चिकित्सक वृत्ती पणाला लागली आहे, पण इथे बौद्ध असे म्हणण्या ऐवजी नवबौद्ध असा उल्लेख नसायला हवा होता हो हे खर आहे बाबासाहेबांच्या आदेशानुसार पूर्वी चे महार आता बाबासाहेबांनी लाखो पुस्तके अनेक वर्षाची पायपीट करून कोळशाच्या खाणीतून हिरा शोधावा तसा अनेक धर्मातून बौद्ध धम्म जा निवडला आहे ते इतर धर्मात जाऊ शकले असते जसे गर्भश्रीमंत असलेला ख्रिश्चन बाबासाहेबांच्या ह्या निर्णयामुळे दलितांचे पार आयुष्यच पालटून गेले असते असो व बाबासाहेबांनी स्वाभिमान नैतिकता समाजाविषयी समाज सुधारणे विषयी असलेली आसक्ती ह्या नैतिक मूल्यांना गृहीत धरून महार जातीला बौद्ध धम्मात रूपांतर केले आणि त्याचा परिणाम असा झाला की बौद्ध आज अंधश्रद्धा कर्मकांड देवावरची अंधश्रद्धा ह्यापेक्षा त्यांनी स्वःताची प्रगती ,अगाध असा स्वाभिमान समाजात मानाने राहण्याचा आणि जगण्याचा अट्टाहास पूर्ण केला बाबासाहेबांनी दिलेला हाच सददधम्म शेवटचा असे मानून बौद्धांनी स्वःताची प्रगती साधलेली आहे आज ते कोना सोबत शिवाशिव करत नाही ना करूनदेत हे बौध्द धमाच्या यशाचे द्योतक आहे.

  6. Aditya Lele

      7 वर्षांपूर्वी

    "बाबासाहेबांनी जलम्‌भर जगातल्या समद्या धरम्यांची बुकं पालथी घातली आन्‌ बुद्धधरम चांगला म्हून आमाला सांगतिलं. आई जाईल तिकडे लेकरं जानार. बाबासाहेब आमची माय हुती. तुमी म्हंता मुसलमान का नाही झाला? परक्याच्या धरमात कसं जावं? बाबासाहेब इक्ते मोठे हुते, की त्याह्यनी आमाला मुसलमान नाही तर किरिस्तावाच्या घरमांत जाया सांगितलंच नसतं. मोठा मानूस असं इपरीत कसं सांगल? दुसरं असं, आमाला आमचा हक पायजे, पाकिस्तान नको." हे वाक्य बाबासाहेबांची महती सांगून जातं.

  7. डा व्यंकटेश अंबादास लिगदे

      7 वर्षांपूर्वी

    50/55 वर्षापूर्वीच महाराष्ट्र नवबौद्ध यान्च जीवन वाचल आता शहरात परिस्थिती बदलली आहे नवबौद्धाना ब्राह्मण वस्तीत घर भाड्याने देतात घरात कामाला राजवाड्यातील महिला चालतात खेड्यात मात्र यान्ची वस्ती गावकुसा बाहेर असते

  8. Jayashree Galgali

      7 वर्षांपूर्वी

    Nice article.

  9. Kiran Joshi

      7 वर्षांपूर्वी

    एका मोठ्या सामाजिक परिवर्तनाचा हा एक उत्तम धांडोळा! आजच्या घडीला सद्यस्थिती काय आहे हे जाणता येऊ शकेल काय?

  10. Vijay vital raibole

      7 वर्षांपूर्वी

    Nice one



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts