लग्नाचे जेवण मुलीकडे असे. ज्यामध्ये वराचे नातेवाईक व इतरांना आमंत्रण असे. मुसलमानांच्या सणसमारंभात मांसाहार महत्त्वाचा आहे. जुन्या जमान्यात लग्नाचे जेवण म्हणजे सालन (मटणाचा रस्सा) व पुलाव, जोडीला काही भागात वांगी, गवार अशा भाज्याही करतात. काहीवेळा गोश्त पुलाव अखनी (भाज्या घालून केलेला मटण पुलाव) हा बेत असतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रश्श्यामध्ये नारळाचा वापर अधिक असतो. तर रायगड, ठाणे जिल्ह्यांत कांद्या-टॉमेटोचा प्रभाव आहे. पोर्तुगीजांनी टॉमेटॉ हे फळ भारतात आणले. मुगल बादशहा जहांगीरला हे फळ भेट म्हणून देण्यात आले आणि नुरजहाँने तळलेल्या कांद्यात टॉमेटो घालून मुगलाई जेवणाचा पाय घातला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .