काँग्रेसच्या जुन्या कार्यक्रमावर टीका करणारा नवा जहाल पक्ष हळूहळू उद्भवत होता हे वर म्हटलेच आहे. या पक्षाच्या मते काँग्रेसने सध्या चालविलेली चळवळ म्हणजे एक वार्षिक तर्पण. तीन दिवस एका ठिकाणी जमावयाचे, काही मामुली ठराव पास करावयाचे व मग साऱ्या प्रतिनिधींनीही आपापल्या प्रांतांत जाऊन आपापल्या उद्योगधंद्यांत गर्क व्हावयाचे, यापलीकडे काँग्रेस काही करीत नाही. या टीकाकारांतही उजवे-डावे प्रकार होते. काही जणांना काँग्रेसची कार्यपद्धती म्हणजे अर्ज, विनंत्या, डेप्युटेशनादी सनदशीर चळवळही मान्य होती. मात्र ती नेटाने होत नाही असे त्यांचे मत होते, तर कित्येकांना काँग्रेसची सनदशीर चळवळच मान्य नव्हती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .