१९०६ सालची दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेली बाविसावी राष्ट्रीय सभा राष्ट्रीय सभेच्या इतिहासांत चिरस्मरणीय ठरेल. कारण याच सभेत दादाभाईंनी स्वराज्याच्या महामंत्राचा हिंदवासीयांस प्रथम गुरूपदेश दिला, व याच सभेत स्वराज्य-स्वदेशी-बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ह्या स्वावलंबनी चतुःसूत्रीचा प्रथम उल्लेख झाला. दादाभाईंनी आपल्या एकंदर स्वानुभवाने नंतर स्पष्ट सांगून टाकले की, स्वराज्य मिळेपर्यंत सरकारी राज्यकारभारातील बऱ्यावाईट प्रकारावर सक्त नजर ठेवणे हे जरी राष्ट्रीय सभेचे कार्य असले तरी देशाच्या सध्याच्या हाल-अपेष्टा स्वराज्य मिळाल्याशिवाय संपणार नाहीत. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्हाला याचना करावयाची नाही, तर स्वतःचे हक्क मागावयाचे आहेत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .