१९०९ सालची चोविसावी राष्ट्रीय सभा लाहोर येथे पं. मदनमोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली भरली. गेल्या काँग्रेसच्या पूर्वी मोर्ले-मिंटो सुधारण्याची योजना प्रसिद्ध झाली होती व त्या वेळी काँग्रेसने तिचा उत्साहपूर्वक सत्कार केला होता. पण जेव्हा त्या सुधारणा कायद्याच्या स्वरूपांत प्रगट होऊन १९०९चा इंडियन कौन्सिल ऍक्ट प्रसिद्ध झाला व तो अमलात आणताना हिंदुस्थान सरकारने जे नियम केले त्यामुळे मूळ सुधारण्याचे स्वरूप इतके विकृत झाले की, त्यामुळे नेमस्त पुढाऱ्यांचीही निराशा झाली. या नियमांप्रमाणे कौन्सिलांच्या जागांची जी वाटणी झाली तीत मुसलमानांना फाजील सवलती देण्यात आल्या. जातवार प्रतिनिधित्वाचे तत्त्व घालून मुसलमानांचा सवता सुविधा निर्माण करण्यात आला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .