१९१३ मधील अठ्ठाविसावी राष्ट्रीय सभा कराची येथे नबाब सय्यद महम्मद बहादूर यांच्या अध्यक्षतेखाली भरली. डेलीगेट ३४९ होते. अध्यक्ष हे टिपू सुलतानच्या वंशांतले असून एक खानदानी मुसलमान पुढारी होते. गुदस्त सालीच बाल्कन युद्धास सुरुवात होऊन तुर्कस्थानची शकले होण्याची वेळ आली होती व खिलापतीवर संकट आले होते, तेव्हा मुसलमान पुढाऱ्यांना हिंदूंशी सहकार्य करावे असे वाटू लागले होते. लखनौ येथे भरलेल्या मुस्लीम लीगच्या अधिवेशनात राष्ट्राच्या प्रगतीला निरनिराळ्या जातींत ऐक्य असणे आवश्यक आहे व म्हणूनच हिंदु-मुसलमानांचे पुढारी एकत्र बसून विचारविनिमय करतील तर बरे होईल, असे अध्यक्ष ना. महम्मद शफी व इतर पुढाऱ्यांनीही बोलून दाखवले होते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .