“हा ठराव सर्वांनी एकमताने पास करून, ब्रिटिश साम्राज्यांत हिंदुस्थानास साधा न्यायही जर मिळणार नाही तर साम्राज्याचे बंधन झुगारून देण्यासही हिंदुस्थान तयार आहे असे सर्व जगास जाहीर करावे, अशी माझी इच्छा आहे.” ठरावास अनुमोदन देताना लाला लजपतरायांनी सभामंडप हादरून सोडणारे भाषण केले. ते म्हणाले, “मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगावीशी वाटते ती ही की, जर आपणास राजकारणात निष्ठुर सत्यच पाळावे असे वाटत असेल जर आपणास आपल्या राजकीय आकांक्षा निर्भयपणे व प्रामाणिकपणे मांडावयाच्या असतील व जर आपणास आपल्या खऱ्याखुऱ्या देशाभिमानास जागावयाचे असेल तर आपण हल्ली राष्ट्रात झालेली विचारक्रांती स्पष्ट व खडखडीत शब्दात सांगितली पाहिजे. आपण ह्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचे विचार मांडण्याकरिता जमलो नसून आपल्या राष्ट्रीयसभेच्या उदात्त परंपरेप्रमाणे सर्व राष्ट्राचे विचार काय आहेत हे ठरावाच्या रूपाने नमूद करण्यास जमलो आहोत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .