सर्वपक्षीय परिषद मे १९२८ मध्ये मुंबईत भरली. या परिषदेने पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमून हिंदी स्वराज्याच्या घटनेचा मसुदा तयार करण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपविले. ऑगस्टमध्ये हा रिपोर्ट बाहेर पडला. यालाच नेहरू रिपोर्ट या नावाने ओळखले जाते. या रिपोर्टात वसाहतीच्या दर्जासारखी हिंदी स्वराज्याची रूपरेखा मांडली होती. काँग्रेसच्या बैठकीपूर्वी कलकत्त्यास भरलेल्या सर्व पक्षांच्या सभेत या रिपोर्टाला मान्यता देण्यात आली. फक्त शीख व धर्मवेडे मुसलमान विरुद्ध गेले. १९२८ सालची त्रेचाळीसावी राष्ट्रीय सभा पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरली. या सभेत असा ठराव झाला की, “सर्वपक्षीय परिषदेच्या रिपोर्टात ( नेहरू रिपोर्टात) शिफारस केलेल्या स्वराज्य घटनेचा विचार करून पाहता हिंदुस्थानच्या राजकीय व ज्ञातीविषयक प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत ती एक मोठीच लाभदायक गोष्ट झाली आहे असे काँग्रेसचे मत आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .