माझ्या चित्रांतल्या कल्पनांना काहीही दम नाही, असे खरे व परखड मत व्यक्त न करता तेंडुलकरांनी मला नव्या नव्या कल्पना देऊ केल्या. त्यांच्या कल्पनांच्या आधाराने 'रुपा' नावाच्या सराफांच्या मासिकात अनेक हास्यचित्रं प्रसिद्ध झाली. तेंडुलकर हे सराफांच्याहीपेक्षा कमी बोलत. त्यामुळे त्यांच्या ऑफीसला माझ्यापुरते मी एक नावच दिले होते-'शांतता झोन'. तेंडुलकर हे "परफेक्शनिस्ट" आहेत, याचा प्रत्यय मला पदोपदी येत असे. माझी हास्यचित्रं ते अनेकदा कडवटपणा न घेता हसत हसत परत करत असत. पण मला कधीही त्यांचा राग आला नाही. किंवा गैरसमज झाला नाही. ते चित्रं शांतपणे न्याहळत आणि गाल फुगवून हसत हसत म्हणत, "जोशीबुवा, हे काही खरं नाही!" म्हणजे मी समजत असे की या चित्राचा बळी घेतला गेला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .