बालविवाहः- हा गुजराथी हिंदु समाजाप्रमाणेच पारसी समाजांतही तितकाच आणि तसाच कल होता. स्वराज्यमंत्राचे आद्य द्रष्टे दादाभाई यांचा विवाह त्यांच्या वयाच्या पांचव्या वर्षीच झाला होता; हे कोणास नुसते सांगून खरे वाटणार नाही. पण त्या काळी ती प्रथा पारसी समाजांत हिंदु लोकांप्रमाणेच सरसही रूढ होती. दादाभाईंचेच वय ५ वर्षांचे; तेव्हा त्यांच्या धर्मपत्नी पूज्या सौभाग्यवती माणिकबाई या पाळण्यांत पडून राहण्याच्या वयाच्या असाव्या हे उघड आहे. बहुपत्नीकत्वाची चाल हिंदु समाजाप्रमाणेच पारसी समाजांत त्या काळी कायदेशीर होती. दोन धर्मपत्नी या कायदेशीर मानल्या जात. (हल्ली मात्र Matrimonial Reform Act मुळे वर्ज्य, पण हा फरक अगदी अलीकडला ४०-५० वर्षांचा.)
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .