अंक - रहस्यरंजन, दिवाळी १९६१
बापू पुन्हां टेबलापाशीं बसला, पण सांठलेली शिसारी एकदम उसळून आल्याप्रमाणें तो थांबला. कारखाना बंद व्हायला अद्याप एक तास होता, परंतु त्यानें फटदिशीं लेजर बंद केलें. कारण आपले डोकें साऱ्या कारखान्याएवढें मोठें झालें, व हा खडखडाट सगळा आपल्याच डोक्यांत होत आहे, असें त्याला वाहूं लागलें होतें. कसल्या आयुष्यावर आपण पैसे लावले, आणि हातीं लागलें काय ! ज्या गावांत जन्मलों वाढलों, तें दोन अडीचशे मैल दूर राहिलें. दोन अडीचशेच नव्हे, तर चांगलें अकराशे चौतीस मैल दूर राहिलें, नव्हे कायमचेंच बंद झालें. पेट्रोलचा वास असलेला काळ्या शर्टातला ड्रायव्हर तो रस्ता बंद करून उभा आहे. यशोदेमुळें इथें आलों. जवळजवळ गिधाडाप्रमाणें तिच्या आयुष्यावर चरत जगतों झालें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .