घरादारावर पाठ फिरवून मोक्षमार्गांचा रहिवासी झालेल्या ह्या श्वानराजाचा चेहरा तुम्ही एकदां न्याहाळून पहा. एखाद्या महानुभावाइतका तो विरक्त व उदासीन दिसेल. हंसणे, खिदळणे, धांवणे व उड्या मारणें, शेपूट हलविणें व तोंड चाटणें आदि सांसारिक उपाधीपासून तो सर्वस्वी मुक्त असल्याचे तुमच्या ध्यानात येईल. हा महानुभावी श्वान साधारणतः धुळीने भरलेला असतो. अनशनाने कृश झालेला असतो. त्याच कारणास्तव तो बराचसा चिडखोरहि बनलेला असतो. मनमोकळेपणानें तो भुंकत नाहीं; पण एखाद्या कोपीष्ट ऋषीप्रमाणें दांत दाखवत, शापवाणी गुरगुरतो व पुष्कळदा अचानक चावाहि घेतो, पण त्याची एकूण वृत्ति मात्र खिन्नतेची व वैराग्याची असते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .