कुणाच्याहि घराची बिनदिक्कतपणें सफर करीत असतां, त्या साहसी कुत्र्यावर पुष्कळदा विलक्षण प्रसंग येतात. कित्येकदां तो पकडला जातो घरधनी काठी घेऊन त्याच्या मागे लागतो, पण तरीहि तो एकाएकी पळ काढीत नाहीं. त्याला कुणीहि कोणत्याहि घरांतून बाहेर काढावे, हाच मुळी त्याला मोठा अन्याय वाटतो. एखाद्या तुच्छ माणसाची त्याच्यावर काठी उगारण्याची छाती व्हावी, ही गोष्ट त्याला अतिशय अपमानास्पद वाटते. त्याला बहुधा माघार तर घ्यावी लागतेच, पण घाबराघुबरा होऊन सपशेल किंवा सुसाट पळ तो कधी काढीत नाहीं. उलट तो त्या घरधन्यालाच दात दाखवतो, त्याच्यावरच गुरगुरतो. जणूं ह्या घरांत खरोखर कुणी उपऱ्या असेल तर तो माणसाचा मुलगाच!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .