पुष्कळ लोक नोकरीच्या शोधार्थ आपापली गावें सोडून मुंबईला येत असल्याचे आपण नेहमीच पाहतो. पण मी मात्र नोकरीच्या शोधार्थ मुंबई सोडली आणि पुण्याला गेलो! थोडाबहुत प्रयत्न व खटपट केल्यानंतर योगायोगानें एके ठिकाणी आमची वर्णी लागली. British Army च्या एका कॅटीनचा मॅनेजर म्हणून माझी नियुक्ति झाली. मला आठवतें, त्या वेळी माझा पगार दरमहा फक्त ३५ रुपये होता ! पण मी ही नोकरी चिकाटीने सांभाळली व थोड्याच दिवसांत Army mess मधील एक उपहारगृह चालविण्याचें कॉन्ट्रॅक्ट मला मिळाले. आजपर्यंत मी चित्रपटांसाठीं शेंकडों कॉन्ट्रॅक्टस्वर सह्या केलेल्या असतील. पण आयुष्यामधील सही केलेलें हेंच पहिलेवहिले 'कॉन्ट्रॅक्ट' होय !
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .