स्वयंवर, मानापमान किंवा अेकच प्याला यासारखी नाटकें संगीत असल्यामुळे त्यांच्या बाबतीत, नाट्यवस्तूची कत्तल उडविण्यासाठी आणखी अेक साधन प्रयोगकर्त्यांना उपलब्ध होते. हें साधन म्हणजे अर्थात् त्या नाटकांतील संगीतच होय. संगीताच्या अतिरेकी हव्यासाने मराठी रंगभूमीच्या गळ्याला नख लावले, असा अेक पक्ष कित्येक टीकाकारांनी मांडला आहे. पूर्वीच्या काळांत खरोखर काय झाले हा प्रश्न अलाहिदा. परंतु सध्या होत असलेल्या प्रयोगांत हें, नाट्यसंगीत आपपरभाव न मानता नाट्य आणि संगीत या दोहोंच्या गळ्याला नख लावण्यांत यशस्वी झाले आहे. नाट्यसंगीत हें मराठी नाटकाचें कोणास ठाऊक, पण महाराष्ट्रीय संस्कृतीचे मात्र अेक अमोल आणि वैशिष्ट्यपूर्ण असें वैभव आहे. गायनाचें अभिजात शास्त्रस्वरूप आणि स्वररचनेचें लालित्य यांचा अपूर्व संगम या संगीतामध्ये झाला आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .