वाचनापासून फायदे होतात असें जाहीर करणारा मनुष्य आपलीं पुस्तकें खपविणारा कोणी तरी धंदेवाईक लेखकच असला पाहिजे. एरव्हीं हा (गैर) समज इतका सार्वत्रिक फैलावला नसता. जगांत आजपर्यंत जे मोठमोठे लोक होऊन गेले आहेत त्यांचें वाचन जवळ जवळ पूज्यचं होत. येशू ख्रिस्तासंबंधीं आज जरी लाखों ग्रंथ लिहिले गेले आहेत तरी खुद्द येशूनें एकही पुस्तक वाचल्याचा दाखला नाहीं. महंमदाने आपल्या धर्माची संस्थापना तरवारीच्या जोरावर केली, लेखणीच्या जोरावर केली नाहीं. भगवान् श्रीकृष्णानें धनुष्यबाण टाकून हताश झालेल्या अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करण्याकरितां गीता सांगितली; वाचायला दिली नाहीं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .