पुस्तकें साफसूफ ठेवावयाला व त्यांची यादी करावयाला वगैरे मला बराच त्रास पडतो असे एकदा मीं सहज अर्धवट विनोदांत उद्गार काढले होते. ते माझ्या कांहीं स्नेह्यांनी लक्षांत ठेवून माझा त्रास शक्य तितका कमी करण्याकरितां माझ्या इथलीं बरींचशीं पुस्तकें त्यांनी आपल्या येथे नेऊन ठेविलीं व आपल्या येथे त्यांची लायब्ररी बनविली. आपल्या मित्राची अडचण लक्षांत आणून त्याला आपण होऊन अशी मदत करावयाला धांवणारे मित्र जगांत हाताच्या बोटावर मोजण्याइतके तरी मिळतील काय? पण माझा दुसरा एक स्नेही होता त्याला संबंध पुस्तकेंच्या पुस्तकें आपल्या येथें ठेवून देणें पसंत नसल्यामुळे परीक्षेला आवश्यक असलेली पानें तेवढींच फाडून घेऊन उरलेलीं सर्व पानें तो प्रामाणिकपणाने मला परत आणून देत असे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .