तर्कशुद्ध चर्चा, परिहासयुक्त रंगतदार संभाषण आणि फर्डे प्रभावी वक्तृत्व ही कहाळेकरांची आकर्षण स्थाने होती. ज्ञानाचे कोणतेही क्षेत्र त्यांना वर्ज नव्हते. राजकारण, इतिहास, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, वाङ्मयसमीक्षा, सौंदर्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र इ. चे तर ते गाढे पंडित होतेच पण विज्ञान, संगीत, आयुर्वेद यांतही त्यांना गती होती. माझे मित्र कै. भा.रं. कुळकर्णी ह्यांच्याशी त्यांनी नक्षत्र ज्योतिषावर प्रदीर्घ चर्चा केल्या, त्यांचा मी श्रोता होतो. भाषाशास्त्र - व्याकरण हा तर त्यांचा खास प्रांत होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .