परंतु खिडकींतून दिसलेला हा चंद्र फार वेगळा होता. तो नुसता उपग्रह नव्हता. परावर्तित प्रकाशाचं तें केवळ साधन नव्हतं. शेंकडों वर्षांपासून या चंद्रासंबंधीं जो गैरसमज पसरविला जात आहे त्यांत बरंच तथ्य आहे असं त्यांना आढळून आलं. काव्य आणि रोमान्स या गोष्टींना कांहीं अर्थ असेल तर तो अर्थ सहस्र धारांनी या चंद्रांतून ओथंबत होता. त्यांनीं चंद्राला पाहिलं, त्याप्रमाणें चंद्रानंहि त्यांना पाहिलं असावं. तो बहुधा मनाशीं म्हणाला असेल, "बरी ही ताराबाई सांपडली आतां माझ्या हातांत!” क्षितिजावरून बसल्या बसल्या त्यानं आपली आयुधं परजलीं आणि ताराबाईच्या अंतःकरणावर एकामागे एक कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .