दहावी ब च्या वर्गावर बालकवींची एक कविता शिकवीत असतां तींत ‘लताकुंज' हा शब्द आला. ठेच लागल्याप्रमाणे त्या एकदम थांबल्या आणि कांपऱ्या-बावऱ्या नजरेनं मुलींकडे पाहूं लागल्या. क्षणभर त्यांच्या मनांत कल्पना आली कीं वर्गातील साऱ्या मुली रांग लावून त्या बागेंतील लताकुंजांत जात आहेत आणि आपण एका झुडुपाच्या आड छडी घेऊन उभ्या आहोत. त्या चटकन् भानावर आल्या. लताकुंज, म्युनिसिपालिटीच्या बागा, तेथे येणारे लोक, चोरून फुलं काढण्याचा कित्येकांचा उद्योग आणि ऊनपावसाचं निवारण करण्यासाठी जन्माला आलेल्या छत्रीचा या उद्योगांत होणारा बेकायदा उपयोग—इत्यादि विषयांवर त्यांनी मुलींना आपली मतं निर्भीडपणे ऐकवली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .