अशी लढाई संपल्यावर कांहीं जणांना या कत्तलीनं गोंधळांत पाडलं असेल. कशासाठीं आहे हे सगळं? कशासाठीं? माणसं लढतात कां नि मारतात कां एकमेकांना? माणूस मेला कीं गेला. जगाचं काय होणर त्याचं सुखदुःख त्याला काय असणार! एखादे वेळेस शेजारचा माणूस गोळीनं पडला असेल. हाच कां पडला? आपण कां नाहीं? हा घाईत होता छे! बायको-मुलांवर प्रेम करीत होता. सरळ आयुष्य होतं त्याचं मग ज्यानं गोळी घातली तो नीच म्हणायचा? त्यालाहि संसार होता. बायकोमुलांत राहून शेतीभाती किंवा कारागिरी करीत दिवस काढावे असं त्याच्याहि मनांत असेल.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .