वझेबुवांनी दीनानाथांना 'मोम–नको फसिया' ही एक भैरवीतील सुंदर चीज शिकविली होती. वीर सावरकरांच्या 'संन्यस्तखड्ग’मध्ये याच चालीला त्यांनीं नवीन वळण देऊन 'सुकता या ' हें पद अजरामर केलें. वझेबुवांना हें पद सुरू असतांना आपल्या चीजेचें स्वरूप मधून मधून दिसूं लागे. म्हणून पडदा पडल्यावर आंत जाऊन त्यांनीं दीनानाथांना विचारले, तेव्हां आपण दिलेल्या चिजेचेंच नवीन रूप म्हणून शिष्यानें सांगितलें तेव्हां हर्षभरीत होऊन बुवा "ही चीज तूं जास्त सुंदर केलीसच; पण प्रसंगाला तशा उत्कट भावनेनें पूर्ण अशी केलीस ! शाबास !” बुवांनी गहिंवरून त्यांनी दीनानाथांची पाठ थोपटली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Sunil Joshi
2 वर्षांपूर्वीचागला लेख. एकलव्य म्हणजे कोण ?