हेमिंग्वेचें हें लौकिक व्यक्तित्व इतकें समर्थ व संपन्न आहे कीं प्रतिभेच्या साहाय्यानें त्यामधून निरनिराळीं स्वायत्त व परस्परविरोधी वाङ्मयीन व्यक्तित्वें निर्माण होणें सहज शक्य होतें. तसे होऊ शकलें असतें तर हेमिंग्वेचे वाङ्मय आहे त्याहून अधिक संपन्न व अधिक शाश्वत होऊं शकलें असतें. पण हेमिंग्वेची प्रतिभा ही मूलतः नाट्यात्मक नसल्यामुळे त्याला हें जेवढ्या मोठ्या प्रमाणावर साधायला हवें होतें तेवढे साधलेलें दिसत नाहीं. शिवाय, हेमिंग्वेच्या बहुतेक सर्व वाङ्मयामध्यें वाङ्मयीन व्यक्तित्वाचा लौकिक व्यक्तित्वाशी असलेला संबंध हा तटस्थतेचा किंवा निरीक्षकाचा नसून सहकार्याचा व अभिव्यक्तीचा आहे. या संबंधामध्येंच त्याच्या बहुतेक सर्व वाङ्मयाची शक्ति व मर्यादा सामावलेली आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .