सिरे येथील वाडा पडका असून त्याच्या भोंवतालचा प्रदेश कंगाल व नापीक होता. त्यावर वनश्रीनें फारशी कृपा केलेली नव्हती असें दिसतें. तथापि व्हॉल्टेअरनें आपल्या दरसाल तीस हजार रुपयांपर्यंत वाढलेल्या उत्पन्नाचा बराच भाग खर्चून वनश्रीच्या फाटक्या प्रसादपटास ठिगळ देण्यासाठीं वाडा दुरुस्त करून त्याच्याभोंवती बाग तयार करविली. याशिवाय त्यानें तसबिरी व पुतळे ठेवण्यासाठी एक दालन व शास्त्रीय विषयांचे ज्ञान करून देण्याची उपकरणी ठेवण्याची एक खोलीही बांधविली. व्हॉल्टेअरची खोली साधारण गृहस्थाची आहे असे न वाटतां एकाद्या राजाची आहे असें वाटतें, इतका तिचा शृंगार सर्वोत्कृष्ट आहे असे एका पाहुण्या मादामनें लिहिलें आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Abhimanyu kale
9 महिन्यांपूर्वीअत्यंत छान विषय तुम्ही निवडला आहे त्याबद्दल मनापासून अभिनंदन ! खरंतर व्होल्टेअर बद्दल मराठीत फारसं काही लिहिलं जात नाही किंवा त्याच्या फारशा पुस्तकांचे भाषांतर देखील झालेले दिसत नाही. जाणकारांनी त्याचे candide हे मराठीमध्ये साहित्य अकादमीने कांदीद या नावाने जे पुस्तक प्रकाशित केले आहे ते नक्की वाचावे अशावेळी 1918 साली त्याच्याबद्दल इतकं लिहिणे म्हणजे खरोखर कौतुकास्पद आहे आपल्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा !!!