भगवानच्या भूमिकांची त्याच्या अभिनयावर पुरेपूर छाप पडली आहे. त्याच्याप्रमाणेंच वेडेवाकडें तोंड करून डोळे एकदम वटारून अडखळत बोलण्याचा नेहमीं तो प्रयत्न करतो. पण भगवानच्या विनोदी भूमिकांची सर कांही त्याला येत नाही. त्यांतल्या त्यांत मद्रासी इसमाच्या भूमिका तो बऱ्या करतो. पण अशा प्रकारच्या भूमिकांत मिरजकर हा विनोदी नट त्याच्यापेक्षां सरस वाटतो. भगवान यांच्या स्टंटपटांत मिरजकर पूर्वी विनोदी भूमिका करीत असे. पण अलीकडे मद्रासी इसमाच्या भूमिकांमुळे सामाजिक चित्रपटांत त्याने स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'हम सब चोर है' मधील बद्रीप्रसाद यांच्या मद्रासी मुनिमाची, 'आखरी डाव' या चित्रपटातील मुत्तुस्वामीची आणि 'दिल्ली का ठग' या चित्रपटातील किशोरबरोबर पत्ते खेळणाऱ्या मद्रासी जुगाऱ्याची त्याची भूमिका तुफान विनोदी आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .