खाली लिहिलेल्या शंका अगदीं नवीन आहेत असें नाहीं. त्या दुसऱ्या कोणास आल्याही असतील व कोणीतरी त्या शंकांची निवृत्ति केली असल्याचाही संभव आहे. कदाचित् कांहीं शंकांची उत्तरे रहस्यादि ग्रंथांतच असतील. तरीपण, स्वतःचे वाचन तितकें मर्मज्ञतेचें विस्तृत नसल्यामुळे प्रस्तुत लेखक ह्या शंका विचारण्यास प्रवृत्त झाला आहे. चांगल्या गोष्टी वरचेवर करीत असावें ( केलेंचि करावें ) असा श्री समर्थांचा उपदेश असल्यामुळे ही चर्चा चर्वितचर्वणरूप अतएव उपेक्षणीय आहे असें कोणी समजणार नाहींत अशी आशा आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .