क्रिकेटचा एक सुजाण टीकाकार म्हणतो की, “ब्रॅडमन हा कलावंत असण्यापेक्षां कारागीर आहे," मी जाणकारांच्या मताला नेहमीच मान देतो. पण मला असं प्रांजलपणे म्हणायचं आहे कीं, ब्रॅडमन हा कलावंत नव्हे, हें मला कोणीहि कितीहि पटवून दिलं तरी पटायचं नाहीं ! कारण क्रिकेटच्या अनभिज्ञालाहि खेळांतील सौंदर्यानं भारावून टाकणारा खेळाडू हा केव्हांहि कलावंतच असणार ! आणि ब्रॅडमनच्या फटक्या फटक्यांत ही शक्ति होती ! जें काय थोडं क्रिकेट मी पाहिलं आहे, त्यांत मॅकार्टनेपेक्षां एकटा ब्रॅडमनच मला आल्हाददायक, आकर्षक फलंदाज वाटला आहे !
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .