आणखी एक महत्त्वाचा पायंडा शास्त्रीजीनी पाडला त्याला खंडप्राय देशाच्या लोकशाहीचे दृष्टीने फार महत्त्व आहे असे मला वाटते. व्यक्ति तितकी मते हे लोकशाहीने गृहित धरलेले तत्त्व आहे. ह्या मतांना जास्तीत जास्त जवळ आणणे- त्यांतून जनकल्याणाा एक सामान्य कार्यक्रम ठरविणे हे लोकशाहीत गृहित कृत्य असते. शास्त्रीजीनी विरोधी मते धारण करणारेही लोकशाहीचे मूलाधार आहेत हे तत्व मान्य केले आणि आपल्या चतुर व प्रामाणिक वागण्याने त्यांनी विरोधी पक्षांचा विश्वास संपादन केला. केवळ कच्छ, पाकिस्तानी सेनेचे काश्मीर आक्रमण व ताश्कंद करार एवढ्यापुरतेच त्यांनी सहकार्य मागितले नाही, तर देशरचनेच्या कार्यात त्यांनी नेहमीच आपला एक हात पुढे ठेवला आहे आणि त्यांचा विनम्र व खऱ्या अर्थाने सहकार्याच्या त्या भावनेलाही विरोधी पक्षनेत्यांनी व जनतेनेही उस्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .