व्यासंगी व विद्वान् पंडित म्हणूनहि त्यांचा फार मोठा अधिकार आहे. राज्यकारण, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कायदा व धर्मशास्त्र यांचा साकल्याने व तौलनिक अभ्यास केलेला असा पंडित भारतांत आज तरी उपलब्ध नाही. महाराष्ट्रांत तर त्यांचेनंतर फक्त त्या अर्थानें श्री. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचेंच नांव घ्यावे लागेल. आणि अशा प्रचंड आणि प्रकांड पंडित्याबरोबर त्यांना भव्य प्रकृति व पल्लेदार गंभीर आवाजाची जोड मिळालेली आहे. ते बोलूं लागले कीं, किरण धरलेल्या वाघासारखी त्यांची नजर त्या विषयांत केंद्रिभूत झालेली असते व त्यांच्या प्रचंड व भव्य शरीरांतून गंभीर आवाज निघू लागला की एकाद्या देवळांतून रुद्राभिषेकाच्या वेळी होणाऱ्या सिंहनादाची आठवण होते!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .