कर्नल कूट म्हणून एक युरोपियन पाहुणे महाराजांच्याकडे आले होते. त्यांच्यासाठी खास 'पिग स्टिकिंग'चा शिकारीचा कार्यक्रम आंखला होता. नियोजित दिवशी गोऱ्या पाहुण्यांसह महाराजांनीं व आम्हीं रामबाग कँपकडे कच केलें. डुकरांचा ठावठिकाणा हेरून हांके घालणाऱ्यांनी एका ओढ्यांत हांका घातला. ओढ्याच्या शेवटच्या कोपऱ्यांत डुकरें येऊन थांबत. तेथूनच थोडी थोडीं बाहेर पडत व उजव्या बाजूला असलेल्या माळाने पळण्याचा प्रयत्न करत. परंतु घोडी पाठीस लागली कीं, लगेच उजव्या बाजूस वळण घेऊन पुन्हां ओढ्यांतील जंगलांच्या जाळीत घुसत. कर्नल कूटनीं पांचसहा वेळां डुकरांचा पाठलाग करून भाला लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना शिकार साधली नाहीं. सहाहि वेळां त्यांना चकवून डुकरें निसटली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .