विहिरींतून वर यायला एका बाजूला थोडी वाट होती. तिथून वर येण्याचा प्रयत्न करूं लागलें डुक्कर आतां वर उडी घेणार, सर्वांनीं हुश्शार राहावें असा मीं आवाज दिला. आम्ही सर्वजण घोड्यावरून उतरून पायींच होतों. मी भाला घेऊन पुढे सरसावलों, तेवढ्यांत आमच्या पैकीं एक शिकारी म्हणाला, “ मी लावतों भाला. त्याच्या उत्साहावर मला विरजण टाकावयाचें नव्हते. पण तरीहि सावधानतेची सूचना म्हणून मी म्हणालो, “ सामना समोरासमोर आहे. तुम्ही थोडा जरी भ्याला तरी डुक्कर हल्ला केल्याखेरीज राहणार नाही." पण त्या शिका-यानें माझें ऐकलें नाहीं. व डुकराच्या मार्गात ते भाला घेऊन उभें राहिलें. एवढ्यांत डुकराने विहिरींतून वर उडी घेतली व त्या शिकाऱ्याकडे तें रोखून पाहूं लागलें. डुकराचा त्वेष पाहून शिका-याचा धीर सुटला
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .