"पण गल्लाभरू चित्रपट निर्माण करण्याच्या निर्मात्यांच्या वृत्तीमुळें समाजावर त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे, अशी आज सर्रास ओरड आहे. या निर्मितीला कारणीभूत कोण, निर्माते कीं प्रेक्षक ?"
"हा प्रश्न थोडासा वादग्रस्त आहे बुवा. निर्माते म्हणतात, आम्ही मागणी तसा पुरवठा करतो. लोकांच्या आवडीनुसार निर्मात्याला चित्रपट काढावे लागत असल्यामुळे वाटेल तें करून चित्रपट यशस्वी करणं हेच त्याचं ध्येय असतं. थोडक्यात म्हणजे साध्यासाठी साधनांचा भल्याबुऱ्या प्रकारे वापर करावा लागतो. अशा वेळी सर्व निर्मात्यांनी एक होऊन वास्तववादी व आशयपूर्ण चित्रनिर्मिति करण्याचे ठरवल्याशिवाय चित्रपट व जनतेची अभिरूचि दोन्हीहि सुधारणार नाहींत. चित्रपटांमुळे जनतेची नीतिमत्ता सुधारू व बिघडू शकते."
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .