वैद्यांनी यज्ञगुप्तास काय झालें तें विचारलें. त्यावर अपचनामुळे ती पोट दुखी झाली असें त्यानें सांगितले. म्हणून वैद्यानीं त्यावर औषधी योजना केली. त्याकारणानें त्याला शयनागारांत नेऊन ठेवलें, तिथे तो सारी रात्र वेदनांनी विव्हळत राहिला. त्याला झोंपही नीटशी मिळाली नाहीं. अशा काहीँ रात्री त्यानें बेचैनींत घालविल्या. त्याचा आहार तुटला, खायला पातळसे पदार्थ आणि जात जातिचीं औषधे खाऊन तो अगदी दुर्बळ दिसू लागला. त्या दिवसांत कमलिनीने त्याची उत्तम सुश्रूषा केली. ती त्यावेळी पतीचे नाते विसरून त्याची जिवापाड मेहनत करू लागली त्याच्या त्या आजारपणाने तीही किती खगली, केवढी रोडावली !
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .