हा अनुभव लक्षांत घेऊन ताईला सासरी जाताना मी पत्राबद्दल बजावले. मला आता उत्तर लिहिण्याची ओढ लागली होती. कोणत्याहि परिस्थितीत आलेल्या पत्राला उत्तर धाडायचेच असा मी निश्चय केला. अर्थात त्यासाठी पत्र येण्याचीच फक्त गरज होती. पण ताईने मला लिहिलेले पत्रही तसेच होत. अभ्यास करावा, आईचं ऐकावं यासारख्या गोष्टी पत्रात लिहिण्याची गरज असतेच कां ? आता मला वाटतं की लहानपणी मला 'मोठ्या कौतुकाने' पाठविलेल्या पत्रांकडे माझ्या चरित्रकारांनी पाहिले तर मी घरात आईला खूप त्रास देत होतो, अभ्यास व्यवस्थित करीत नव्हतो. परवचा म्हणत नव्हतो. यासारखे गैरसमज होतील. स्वतंत्र कार्डावर तर जाऊच द्या. दुसऱ्याच्या पत्रातून आम्हाला जे छटाकभर पत्र यावयाचे त्यातहि प्रत्येकाने हाच उपदेश केलेला असायचा.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .