निरनिराळ्या कचेऱ्यातून येणारी उत्तरे ठरीव सांच्याची असत. त्यात माझ्या पत्राचा त्यांच्या दप्तरी पडलेला रेफरन्स नंबर (तो वाचताना अर्धा उत्साह खलास होई) देऊन 'जागा नसल्याचे' 'खेदपूर्वक' सांगितलेले असायचे. आपल्यासाठी काही करता येत नसल्याने त्या भल्या माणसांना वाईट वाटतंय हे पाहताना मला गहिवरून येत असे. पुढे एका फर्ममध्ये चिटकल्यावरचा तिथला प्रेमळ पत्रव्यवहार मी एका स्वतंत्र फायलीत जपून ठेवला आहे. ती सगळीच पत्रे जपून ठेवावी लागणार. काय निवडावं हा प्रश्न मनाला शिवणार नाही की, रेफरन्स नंबरचा राग येणार नाही. त्या पत्रातून कानपिचक्या आहेत. हलगर्जीपणाबद्दल दिलेला दम आहे. निरनिराळे हुकूम आहेत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


















