सांप्रत विनोदाला पुनः एकदा वाईट दिवस येतील की, काय अशी भीति वाटत आहे. रामदास स्वामींच्या काळात विनोद म्हणजे टवाळखोरी असे मानले जाई. दाढी-मिशी आणि विनोद यात काही तरी मूलतः वाकडे असावे असा आमचा कयास आहे. दाढी-मिशीवाल्यांना सहसा विनोद आवडत नाही. ते हंसतहि नाहीत. चुकून कधी हंसले तरी ते दाढी-मिशीतून दिसतहि नाही. या आमच्या मतास पुढे पुरावाहि मिळतो. पुढे पुढे दाढी-मिशीवर संक्रांत येत गेली तसतशी विनोदाची वाढ होत गेली. कोल्हटकर, गडकरी यांनी दाढी ठेवली नाही फक्त मिशांवरच त्यांनी भागवले. चिं. वि. जोशी यांनी काही वर्षे मिशा ठेवल्या. पण पुढे काढल्या. आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे वगैरेनी तर मिशा काढूनच विनोदाला हात घातला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .