आम्हीं सुरक्षितपणें इच्छित स्थळाला पोंचलों त्यावेळीं माझ्या सोबत्यांनीं माझें कौतुक केलें व त्याबरोबर मला आनंदहि झाला. पण खरें सांगायचें तर तें कौतुक स्वीकारण्याचा मला कांहींच अधिकार नव्हता. कारण त्यांचा मार्ग सुगम करण्यासाठीं कांहीं मी साहसाला प्रवृत्त झालों नव्हतो. मला एका अपूर्व व अननुभूत अशा भावनेचा आस्वाद घ्यायचा होता. संधि चालून आली होती. तेव्हां तिचा फायदा घेण्यासाठीं मी माझ्या आवाक्यांत होते त्याचें मोल दिलें, त्यामुळे माझ्या सोबत्यांच्या हिताला मी अप्रत्यक्षरीत्या कारण झालो असेन. त्याबद्दल त्यांनी माझें अभिनंदन करावें हें त्यांच्या दृष्टीने बरोबर असले तरी माझ्या त्यागाचा मोबदला मला आगाऊच मिळून गेला होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .