मधुसूदनराव म्हणजे दणदणीत शरीराची आणि तेवढ्याच दणदणीत आवाजाची एक व्यक्ति होती. लीलाने त्यांच्याशीं कां लग्न केलं हा बाळासाहेबांना कधीहि न सुटलेला एक प्रश्न होता. मधुसूदनराव म्हणजे अतिशय विद्वान, कधीहि न चुकणारा मनुष्य. त्यांनीं कांहीं सांगितलं म्हणजे तें तसं असलंच पाहिजे. त्यांच्या बोलण्याच्या ओघांत दुसऱ्याला विरोध करण्याची संधीच मिळायची नाहीं. आणि म्हणूनच मनांतल्या मनांत त्यांना सारखा विरोध करीत राहावं असं वाटायचं. ते जर तुमच्याकडे एकदम वळून जोरांत म्हणते, ‘तुम्ही एक माणूस आहांत’ तर त्यांची जिरवण्यापुरती का होईना आपल्याला मारुतीसारखं एखादं शेपूट असायला पाहिजे होतं असं वाटायचं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .