अंक – किर्लोस्कर खबर, जानेवारी १९२५
संपादकाचे काम अगोदरच जबाबदारीचे त्यांतल्या त्यांत परकीय सत्तेखालीं असलेल्या हिंदुस्थानसारख्या देशांत ही जबाबदारी जास्तच वाढते. सरकार परकी असल्यामुळे जनतेचे व सरकारचे हितसंबंध भिन्न पडतात. आणि लोकांची बाजू पुढे मांडतांना स्वमतसमर्थनार्थ अधिका-यांच्या विचारांतील दोष दाखवावे लागतात. स्वदोषाविष्करण हे सर्वासच अप्रिय असतें. त्यांतल्या त्यांत अधिकार हाती असला ह्मणजे त्याचा उपयोग करून घेण्याची बुद्धी होते आणि अशा रीतीनें अधिकाऱ्यांच्या रोषास पुष्कळ संपादकांना बळी पडावें लागलें आहे. परंतु मालवीयजींचे लिहिणे समतोल व विचारसरणी तर्कशुद्ध असल्यामुळे त्यांच्यावर अधिकाऱ्यांचा रोष होण्याऐवजी सरकारच्या वार्षिक अहवालांत त्यांचा गौरवच करण्यांत आला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .